Gokul election | ‘गोकुळ’च्या बेकायदेशीर 1,200 दूध संस्थांची नोंदणी रद्द करा Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Election : करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड ठरवणार सत्ताधारी

गोकुळच्या निवडणुकीत चार तालुक्यांचे महत्त्व वाढणार

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या या करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड तालुक्याच्या हाती असणार आहेत. सर्वाधिक दूध संस्थांचे ठराव असल्याने या चार तालुक्यांचे महत्त्व निवडणुकीत वाढणार आहे. सोमवारपासून (दि. 9) सहायक निबंधक दुग्ध कार्यालयाकडून ठराव मागविले जाणार आहेत. त्यामुळे आता दूध संस्थांचे राजकारण तापणार असून गावागावांत ठराव घेण्यासाठी आजी-माजी संचालक, नेत्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये चढाओढ निर्माण होणार आहे.

गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गोकुळने सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केलेल्या 5 हजार 470 सभासद दूध संस्थांच्या प्रारूप मतदार यादीची छाननी पूर्ण झाली आहे. छाननीमध्ये नोंदणी रद्द झालेल्या आणि अवसायनात निघालेल्या 62 संस्था अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता ठराव मागविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

ठरावात करवीर आघाडीवर

दूध संस्थांच्या ठरावात जिल्ह्यात करवीर तालुका आघाडीवर आहे. करवीरमध्ये सर्वाधिक 868 ठराव आहेत. सर्वाधिक ठराव असले तरी येथे आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी जि.प. अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक चेतन नरके यांचे ठराव असणार आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याच्या वाटणीला किती ठराव येणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT