Kolhapur Accident
कोल्हापूर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चुये फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह मोटारचालकाचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी शंकर कोळी आणि अतुल अरविंद पाटील, अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकी आणि मोटार यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.