कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात यंदाची गणेश मिरवणूक निर्णयाक ठरण्याची शक्यता आहे. डॉल्बी आणि साऊंड सिस्टमचा आवाज कमी करावा यासाठी अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोनल केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने देखील कडक निर्बंध लागू केले आहे.
कोल्हापुरात पोलीस प्रशासनाने यंदा महाद्वार रोडवरील कोंडी फोडण्यासाठी सिग्नल सिस्टम लागू केली असून एका मंडळाला एका जारी फक्त २० मिनिटे थांबता येणार आहे. जर या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले तर यंदाची मिरवणूक रेंगाळण्यापेक्षा लवकर संपेल अन् प्रशासन आणि सामान्य नागरिकांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात मोठी दुर्घटना, करवीरचा राजाची मूर्ती रस्त्यातच कोसळली
शाहू महाराजांच्या हस्ते प्रथम मानाच्या गणपतीची आरती, पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तुकाराम तालीम मंडळाच्या गणपतीच्या आरतीवेळी आमदार राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील देखील उपस्थित होते.
वाय पी पोवार नगरमधील प्रसिद्ध बॅलेन्सिंग मूर्ती देखील विसर्जन मिवरणुकीसाठी मंडळाच्या मांडवातून बाहेर पडली आहे. मूर्ती बॅलेन्सिंग असल्यानं अत्यंत सावध पद्धतीनं हळू हळू पुढे नेण्यात येत आहे.
मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, गंगावेश चौक या मार्गावर सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविली आहे. मार्गावर अतिरिक्त विद्युत व्यवस्थेसाठी हेरिटेज खांबांवर २०० वॅट क्षमतेचे ३० फ्लड लाईट बसविले आहेत.
कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती तुकाराम तालीम मंडळाचा गणपती विसरजन मिवरणुकीत बाहेर पडला आहे.