कोल्हापूर

kolhapur Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री 12 नंतर वाद्यबंदी

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक व पारंपरिक वाद्यांना बंदी राहणार आहे, असे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शासन आदेश व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर, उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विसर्जन मिरवणूक मार्गासह परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या मार्गाने परवानगी देण्यात येईल, त्याच मार्गावरून मिरवणूक नेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा फौजफाटा वाढविला आहे.

वाहतूक मार्गात विस्कळीतपणा येऊ नये, यासाठी ठिकठिकाणी वाहतूक शाखेची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याने याकाळात चोरी, चेनस्नॅचिंगचे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रमुख रस्ते, महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचेही टिके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT