प्रकाश रंगराव चव्हाण Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Farmer Death | गगनबावड्यात गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू 

गगनबावडा तालुक्यातील बावेली पैकी भटवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Farmer Dies In Bison Attack Gaganbawda

साळवण : बावेली पैकी भटवाडी (ता. गगनबावडा) येथील शेतातून घरी परतताना गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश रंगराव चव्हाण (वय ४५) यांचा शनिवारी (दि.१४) सकाळी सीपीआर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गव्याने दिलेल्या धडकेत शिंग पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बुधवारी (दि.११) सायंकाळी ही घटना घडली होती. 

अधिक माहिती अशी, चव्हाण हे बुधवारी सायंकाळी 'मालच शेत' येथील काम आटोपून घराकडे परतत असताना वाटेत समोरून येणाऱ्या गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. यामध्ये रानगव्याचे शिंग त्यांच्या पोटात घुसून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने बावेली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चव्हाण यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन वनविभागाने शासनाच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक भरपाई द्यावी, तसेच कुटुंबाला आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT