क्रॅक बाब्या हॅशटॅग ८८ गँग  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Crime | गडहिंग्लजमधील क्रॅक बाब्या गँगचे दहाजण १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

Gadhinglaj Crime News | गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहेत

पुढारी वृत्तसेवा

Gadhinglaj police action

गडहिंग्लज: गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये शहरातील क्रॅक बाब्या हॅशटॅग ८८ गँग या टोळीतील बाब्यासह अन्य दहा जणांना १० नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले की, किरकोळ कारणातून मारहाण करणे, हल्ले करणे असे प्रकार केल्याने या क्रॅक बाब्या टोळीविरोधात पोलिसांनी योग्य पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पाठविला होता. यातील टोळीचा म्होरक्या क्रॅक बाब्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. या सर्वांमुळे जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी या टोळीतील दहाही जणांना वर्षभरासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधून हद्दपार केले आहे.

यातील प्रवीण अरुण संकपाळ, युवराज उर्फ यशवंत अरुण संकपाळ (दोघेही रा. कडगाव रोड, गडहिंग्लज), शेखर सचिन जाधव (रा. ऐनापूर) हे तिघे विविध गुन्ह्यांखाली कारागृहात आहेत. विवेक उर्फ क्रॅक बाब्या शिवाजी घुरे (वय २१, रा. साधना हायस्कूलजवळ गडहिंग्लज), निखिल उर्फ पोपट सुभाष दळवी (वय ३२, साधना हायस्कूलमागे गडहिंग्लज), शरद अशोक कोरवी (वय २५, रा. भैरापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), अक्षय पांडुरंग नार्वेकर (रा. कडगाव, ता. गडहिंग्लज), सोहम संजय गायकवाड (वय २०), आदित्य राजेंद्र संभाजी (वय २२, दोघेही रा. गडहिंग्लज) यांना हद्दपारीच्या नोटीसा लागू करून पोलिसांनी आज जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू केली.

तर यातील रोहित उर्फ सोन्या विजय तिट्टे (रा. विश्रामबाग कॉलनी, गडहिंग्लज) याच्यावर उद्यापर्यंत कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय गडहिंग्लजमधील आणखी एक आठ जणांची टोळी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांचाही प्रस्ताव मंजूर होऊन येताच, तातडीने कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी ही कारवाई गतिमान केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT