महेश तुरबतमठ Pudhari
कोल्हापूर

Gadhinglaj Municipal Council Politics | गडहिंग्लजमध्ये खळबळ; नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांचा जातीचा दाखला अवैध

प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद बिलावर यांच्याकडून दाखल्याबाबत तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gadhinglaj Municipal Council President Invalid Caste Certificate Case

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांचा बेडाजंगम जातीचा दाखला जात पडताळणी कार्यालयाने अवैध ठरविला. यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तुरबतमठ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) विजयी झाले होते. यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद बिलावर यांनी त्यांच्या दाखल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

गडहिंग्लज नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून महेश तुरबतमठ तर जनता दल, भाजप, जनसुराज्य आघाडीकडून गंगाधर हिरेमठ यांनी बेडाजंगम हा जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढवली. यामध्ये तुरबतमठ यांनी १२ हजार ३५० मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांना मात दिली.

यानंतर अपक्ष व सध्या भाजपमध्ये असलेले उमेदवार विनोद बिलावर यांनी तुरबतमठ यांचा बेडाजंगम जातीचा दाखला चुकीचा असून, याबाबत जातपडताळणी कार्यालयाकडे तक्रार केली होती. यानंतर याबाबत सुनावणीही पार पडली होती. अखेर या कार्यालयाने संकेतस्थळावर तुरबतमठ यांचा हा दाखला अवैध असल्याचे दर्शविल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

माझी सर्व कागदपत्रे बरोबर असून हा माझ्यावर अन्याय झाला आहे. यासाठी उच्च न्यायालयात अपील करणार आहे.
- महेश तुरबतमठ, नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT