Gadhinglaj bus stand accident
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज बसस्थानकानजीक बस बसस्थानकामध्ये जात असताना डाव्या बाजूला असलेली महिला चालकाला दिसली नसल्याने तिला एसटीचा जोरात धक्का बसून ती चाकाखाली आली होती. सुदैवाने महिला बस खाली सापडली नाही. मात्र, ती गंभीररित्या जखमी झाली.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून अंगावर शहारे येण्यासारखा प्रसंग आहे. गडहिंग्लज शहरातील सविता बिलावर या कामानिमित्त बसस्थानकाकडे जात असताना त्याच दरम्यानआलेल्या एसटीने त्यांना डाव्या बाजूला धडक दिली. चालकालाही महिला समोर आल्याचे लक्षात न आल्याने तिला एसटीची धडक बसली.
ही महिला चाकाखाली जाण्यापासून थोडक्यात बचावली. चालकाने ही प्रसंगावधान राखून ब्रेक दाबला. एसटी बसच्या धक्क्याने मात्र महिलेच्या मणक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर महिला सुदैवाने बचावल्याचे दिसून आले.