धग युद्धाची; धास्ती इंधनाची 
कोल्हापूर

Kolhapur petrol pump : धग युद्धाची; धास्ती इंधनाची

दहा दिवसांच्या बुकिंगनंतरही मिळेना गॅस ः पेट्रोल संपण्याच्या अफवांमुळे पंपांवर तोबा गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इराण व इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची भीती निर्माण झाल्याने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात गॅस एजन्सीसह पेट्रोल पंपांवर अभूतपूर्व गर्दी उसळली. शहरापासून ग््राामीण भागापर्यंत सर्वत्र वाहनांच्या लांब रांगांनी नागरिकांची धास्ती स्पष्टपणे दिसून आली.

सोमवारी ग््राामीण भागात पेट्रोल टंचाई निर्माण होणार, दरवाढ होणार अशा अफवा वेगाने पसरल्या. या चर्चांनी मंगळवारी शहरातही शिरकाव केला आणि सकाळपासूनच वाहनधारकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. परिणामी अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही पंपांवर व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले. उमा टॉकीज, पार्वती टॉकीज परिसर, कावळा नाका, खानविलकर पंप, कसबा बावडा यांसह उपनगरातील सर्वच पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढल्या. गर्दी दिसली की, आपणही पेट्रोल भरून घ्यावे या मानसिकतेमुळे परिस्थिती आणखी चिघळत गेली. ग््राामीण भागात सलग दुसऱ्या दिवशीही हेच चित्र कायम राहिले. ग््राामस्थांनी सकाळपासूनच रांगा लावल्याने अनेकांना तासन्‌‍तास प्रतीक्षा करावी लागली.

केवळ 200 रुपयांचेच पेट्रोल

कासारवाडी : टंचाईमुळे अंबप फाट्यावरील कृष्णाई पेट्रोल पंप बंद होते. तर गिरोली, एमआयडीसी, अंबपवाडी फाटा येथील पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. पंपावर एका वाहनाला केवळ 200 रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याची मर्यादा घातली. त्यामुळे रांगा आणखी वाढल्या आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT