Crime News Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : वर्गणीसाठी सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा

शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये काही मंडळांच्‍या कार्यकर्त्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जाते. याचा व्यापारी, हातगाडीवाल्यांसह सामान्‍यांना त्रास होतो. मंडळाच्या आडून काही गुंड असे प्रकार करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यापुढे असे निदर्शनास आल्यास तक्रारीची वाट न बघता संबंधितांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह‍ेगारांची हजेरी घेण्यात आली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मंडळांच्या नावाखाली सराईत गुंडांकडून सक्तीने वर्गणी गोळा केली जात आहे. यासंबंधी आलेल्‍या तक्रारींची खातरजमा केली जात आहे. यात तथ्य आढळल्यास पोलिस सुमोटो खंडणीचा गुन्हा दाखल करणार आहेत, असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT