कुरुंदवाड शहरात पुराचे पाणी शिरले आहे. Pudhari news network
कोल्हापूर

कोल्हापूर : कुरुंदवाड शहरात शिरले पुराचे पाणी; नागरिकांचे स्थलांतर सुरू

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी शिवतीर्थाचा रस्ता ओलांडून अखेर कुरुंदवाड शहरात आले आहे. तर कृष्णा नदीच्याही पुराचे पाणी शिकलगार वसाहतीत आले आहे. पाण्याने शिवतीर्थ ओलांडले की शहर सोडायचे या मानसिकतेत असणाऱ्या कुरुंदवाडकरांनी स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे.

कुरुंदवाड शहराला चोहोबाजूने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा प्रवास असतो. २०२१ सालानंतर यावर्षी पावसाने थैमान घातल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीच शिरढोण- कुरुंदवाड, हेरवाड-अब्दुललाट, दानवाड- एकसंबा हे मार्ग पाण्याखाली गेल्याने कुरुंदवाडच्या नागरिकांना स्थलांतर होण्यासाठी नृसिंहवाडी-शिरोळ हा एकमेव मार्ग खुला आहे. २०१९ व २०२१ सालच्या महापुरात शिवतीर्थावरून राघवेंद्र टॉकीजकडून महापुराच्या पाण्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर कुरुंदवाड शहरात पाणी आले होते. हा एकमेव स्थलांतरासाठी असणारा नृसिंहवाडी-शिरोळ हा मार्ग बंद झाल्यानंतर कुरुंदवाड शहरातील काही नागरिकांना निवारा केंद्रांचा आधार घ्यावा लागला होता. आताही नागरिकांना स्थलांतरासाठी नृसिंहवाडी-शिरोळ हा एकमेव मार्ग उरला असून पाणी वाढल्यास सकाळीपर्यंत हा मार्गही बंद होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT