सैनिक टाकळी परिसरातील पुराच्या पाण्यात वाढ 
कोल्हापूर

कोल्हापूर : सैनिक टाकळी परिसरातील पुराच्या पाण्यात वाढ; पुरग्रस्तांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

सैनिक टाकळी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढायला सुरूवात झाल्याने उसंत घेतलेली कृष्णा नदी पुन्हा उसळी घेऊन पुन्हा रौद्र रूप धारण करेल का? या चिंतेने पूरग्रस्तांना सतावत आहे. सैनिक टाकळी परिसरातील पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाली असून परिसरातील पुरग्रस्तांना धडकी भरली आहे.

कुरुंदवाड येथील शिवतीर्थजवळील नृरसिंहवाडी रोडवर असणारे महापुराचे पाणी ओसरून प्रवाशांसाठी रस्ता खुला झाला होता. पण पुन्हा गुरूवारी (दि.१) सकाळी पाण्यात वाढ होऊन रस्ता बंद झाला. मागे फिरलेली कृष्णा पुन्हा गावात शिरली आणि पाणी पुन्हा एकदा वाढू लागले. तसेच सांगली, अर्जुनवाड येथे कमी झालेली पाणी पातळी पुन्हा वाढली असून आज पहाटेपासूनच सैनिक टाकळी परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने पाण्यात झपाट्याने वाढ झाली.

मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक छोटे-मोठे पुलही पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाकडून विविध भागात अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तर काही भाागात अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे सैनिक टाकळी परिसरातील अकिवाट, बस्तवाड, खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, जुने दानवाड, नवे दानवाड, सैनिक टाकळी या पूरग्रस्त भागातील स्थलांतरित कुटुंबांसह शेतकऱ्यांनाही धडकी भरली आहे. पुन्हा २०१९ सारख्या महाप्रलयंकारी परिस्थितीशी सामना करावा लागेल की काय ? अशा भावना पूरग्रस्तांमध्ये व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT