पंचगंगा पाणलोट क्षेत्रात धुंवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे गेल्या १२ तासांत पंचगंगेची पाणी पातळी १ फूट ४ इंचाने वाढली आहे. (Kolhapur Flood updates) शुक्रवारी रात्री ९ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४६ फूट ०१ इंच होती. शनिवारी सकाळी ९ वाजता पाणी पातळी ४७ फूट ०२ इंचावर पोहोचली. (Panchganga water level rises)
शाहुपुरी कुंभार गल्ली
व्हीनस कॉर्नर
मुक्त सैनिक वसाहत
लक्षतीर्थ वसाहत
काही तास पावसाने उघडीप दिल्याने धास्तावलेल्या कोल्हापूरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर तस्ते ओढा येथे रस्त्यावर पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. शाहुपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहत, जयंती नाल्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.