पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज (दि.२३) आणि उद्या (दि.२४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यातील पुरुग्रस्त भागातून नागरीकांचे स्थलांतर होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान प्रशासनाने नागरीकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे... (Kolhapur Flood)
जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठी चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर 20 मार्गावरील एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. जर तुम्हाला कोणत्याही स्वरुपाची अडचण उदभवल्यास कोल्हापूर महानगरपालिकाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क करु शकता. संपर्क पुढीलप्रमाणे,
कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत
संपर्क : 0231-254 FC1188
कोल्हापूर महानगरपालिका मुख्य नियंत्रण कक्ष
संपर्क : 8956412103
कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीत मान्सून काळात जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती व्हाटसअॅपवर मिळू शकते. जिल्ह्यातील नागरिकांनी 9209269995 हा मोबाईल क्रमांकावर कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअपवरुन या नंबरवर 1 ते 6 पैकी क्रमांक मेसेज करावेत. यावर पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती मिळेल.
उदा. तुम्ही 9209269995 या मोबाईल क्रमांकावर ३ असा मेसेज केला तर तुम्हाला पंचगंगा पाणी पातळी किती आहे याची माहिती मिळेल
1. पर्जन्यमान (Rainfall)
2. धरण व पाणी पातळी अहवाल (Water Level Information)
3. पंचगंगा पाणी पातळी (Panchaganga River Water Level)
4. महत्वाचे संदेश (Important Messages)
5. आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Contact)
6. रस्ते व वाहतूक (Road and Transport)
7. पुर पातळी नुसार पाणी भागात येण्याची संभाव्य ठिकाणे..
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीमध्ये विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरते निवारा केंद्रांची यादी दिली आहे. ती पुढीलप्रमाणे....
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली २०२४ महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ती तुम्ही पुढील बेबसाईटवर जावून सदर कार्यप्रणाली पुस्तिका https://web.kolhapurcorporation.gov.in/circular या लिंकवर जावून डाउनलोड करु शकता.