All traffic stopped on Gargoti-Kolhapur route
गारगोटी-कोल्हापूर मार्गावर सर्व वाहतूक बंद  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood Update : गारगोटी-कोल्हापूर मार्गावर सर्व वाहतूक बंद

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे गारगोटी- कोल्हापूर होणारी वाहतूक बंद झाली आहे. शेणगाव येथील ३ कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरीत केले आहे. (Kolhapur Flood Update)

गेले आठवडाभर भुदरगड तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. जोरदार वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोलमडून विजेच्या तारावर, खांबावर पडल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी विद्युत पुरवठा चार ते पाच दिवस बंद आहे. त्यामुळे गावागावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.(Kolhapur Flood Update)

गारगोटी-कोल्हापूर मार्गावर मडिलगे नजीक रस्त्यावर पाणी आल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुर म्हसवे मार्गे गारगोटी अशी वाहतूक सुरू होती, मात्र महालवाडी नजीक टेंम्पो रस्त्यात अडकल्यामुळे या मार्गावरीलही वाहतूक काही काळ बंद झाली होती. टेम्पो काढल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तुरळक स्वरूपात हासुर मार्गे कोल्हापूर अशी गारगोटी आगाराची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.(Kolhapur Flood Update)

दरम्यान आज सकाळी तहसीलदार अर्चना पाटील, मंडल अधिकारी आर. एम. लांब, राहुल धाडणकर, सुरेश जंगले, अशोक कुंभार यांनी पूरस्थितीची पाहणी केली.(Kolhapur Flood Update)

तहसीलदार अर्चना पाटील, मंडल अधिकारी आर. एम. लांब,अशोक धाडणकर, सुरेश जंगले यांनी पाहणी केली. (Kolhapur Flood Update)

SCROLL FOR NEXT