कोल्हापूर : गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणी स्वप्निल पाटील (एस.पी.) टोळीविरोधात दाखल मोका गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून, आणखी ५ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. महिला डॉक्टर, मेडिकल दुकानदार आणि मदुराईतील मशिन पुरवठादाराचा रॅकेटमध्ये सहभाग समोर आल्यामुळे करवीर पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले आहे. राजारामपुरी येथील श्री हॉस्पिटलच्या डॉ. सोनल वालावलकर, व्यवस्थापक संदीप सुरगोंडा पाटील (वय ४०, रा. वसगडे) व नर्स संध्या नंदकुमार लोंढे (४२, रा. राजारामपुरी), मेडिकल चालक प्रथमेश मांगलेकर अशी त्यांची नावे आहेत.
गर्भलिंग निदानप्रकरणी गुन्ह्याची व्याप्ती वाढली
गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणी स्वप्निल पाटील टोळीविरोधात दाखल ‘मोका’ गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. आणखीन ५ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. २०२६ मध्ये परिते येथील भोगावती साखर कारखाना क्वॉटर्समध्ये गर्भलिंग करणाऱ्या ११ जणांच्या टोळीवर करवीर पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली होती. संशयितांच्या चौकशीतून राजारामपुरीतील श्री हॉस्पिटल येथे गर्भलिंग निदान व गर्भपात केल्याची माहिती समोर आली. यानुसार करवीर पोलिसांनी श्री हॉस्पिटलच्या दोघांना अटक करून चौकशी केली असता डॉ. सोनल वालावलकर यांचा या प्रकरणातील सहभाग समोर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
यांच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई
स्वप्निल केरबा पाटील, महेश सुबराव पाटील, दत्तात्रय कृष्णात पाटील, श्रीमंत तानाजी पाटील, विजय लक्ष्मण कोळसकर, ओंकार गोरखनाथ कराळे, प्रशांत वसंत जाधव, सुनील प्रकाश पाटील, अनिल प्रकाश टिपुगडे, शिवप्रसाद सत्ताप्पामहादेव पाटील, अश्विनी गजानन शिंदे यांच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई केली.