कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे चार वर्षांपूर्वी दसरा सणाच्या वेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच संग्राम हिंदूराव भापकर (वय 42) याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्वत: याची फिर्याद दिली आहे. हणमंतवाडीचा माजी सरपंच भापकर याच्याकडे शासनाचा बंदुकीचा परवाना आहे. दसरा सणावेळी 11 ऑक्टोबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भापकरने हवेत दोन बार उडविले. मात्र, त्याच्या पुंगळ्या सरकारकडे जमा केल्या नाहीत.
हवेत गोळीबार केल्याचा भापकरचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक सरवदे तपास करीत आहेत.