कोल्हापूर ःरासायनिक खत कंपन्यांकडून खतपुरवठा होत असताना केले जाणारे लिंकिंग बंद करावे, साथी पोर्टल बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनीस्तरापर्यंत राबविण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईडस् सीडस् डीलर्स असोसिएशने सोमवारपासून (दि. 27 ) बेमुदत संप पुकारला आहे. 2,500 कृषी औषध दुकाने बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे रोजची सुमारे 10 कोटींची उलाढाल ठप्प झाली. खतांअभावी उसाची भरणी खोळंबली असून, तणनाशकांसह अन्य फवारण्या थांबल्या आहेत.
आगामी खरीप हंगामात खत वितरणाच्या कार्यपद्धतीत संभाव्य बदल करताना संघटनेला चर्चेत सहभागी करून घ्यावे. रासायनिक खतांचा पुरवठा विक्रेत्यांच्या विक्री केंद्रापर्यंत पोहोचविणे बंधनकारक करावे. आयकर, जीएसटी कायद्याप्रमाणे सर्व खर्च वजा करून आठ टक्के दराने खत विक्रीचा नफा मिळावा. तपासणीमध्ये बियाणे, खते व कीटकनाशके यांचा नमुना अप्रमाणित आल्यास विक्रेत्यास हजर केलेल्या पुराव्यांप्रमाणे तरतुदीनुसार साक्षीदार म्हणून ग््रााह्य धरा. प्रस्तावित जाचक नियम शिथिल करा, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.