विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर ‘पोक्सो’  
कोल्हापूर

Kolhapur Crime : विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर ‘पोक्सो’

कुरुंदवाड परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : येथील शिक्षण संस्था संचलित एका गावातील हायस्कूलमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित शिक्षक अजित दिवटे याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने शिक्षकांकडून चॉकलेटचे वाटप सुरू होते. त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असता संशयित शिक्षक अजित दिवटे याने तिला आत थांबवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार घडल्यानंतर भयभीत झालेल्या पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्‍यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्‍यान, दोन दिवसांपूर्वी संबंधित शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांना निवेदन देण्यात आले होते. संबंधित गावामध्ये असंतोष असून या घटनेमुळे परिसरात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT