पर्यावरण अभ्यासक फारुक मेहतर यांचे निधन झाले. Pudhari Photo
कोल्हापूर

पर्यावरण अभ्यासक फारुक मेहतर यांचे निधन

Farukh Mehtar Death | कोल्हापुरात शोक व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते व अभ्यासक फारुक औरंगजेब मेहतर (वय ५५) यांचे आज (दि. ५) निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

शिवाजी युनिव्हर्सिटीच्या प्रौढ निरंतर शिक्षण अंतर्गत पर्यावरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निसर्ग मित्र तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील तलावांवरील पक्ष्यांचा अभ्यास करून त्याची माहिती देऊन नवनवीन पक्षी अभ्यासक तयार करण्यामध्ये त्यांचे योगदान राहिले आहे.

ताडोबा, नागझिरा, मेळघाट, सागरेश्वर, चांदोली, दाजीपूर, दांडेली आदी जंगलांमध्ये वनस्पती, प्राणी आणि पक्षी अभ्यासकांसाठी शिबिर आयोजित करून जंगलांविषयी सखोल माहिती देण्याचे त्यांचे काम सतत सुरू होते. ग्रीन गार्ड या संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना त्यांनी पर्यावरणाविषयी ज्ञान देण्याचे काम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT