अब्दुललाट (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : अब्दुल लाट (ता-शिरोळ) येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. महिलांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थही यामध्ये सहभागी होते.
अनेक वर्षांपासून याठिकाणी नागरिक राहत आहेत. ग्रामपंचायत विविध कर आकारणी करीत आहे. शासनाने यापूर्वी अतिक्रमण कायम करणेबाबत काढलेल्या अध्यादेशानुसार अनेक अर्ज व प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याचा तात्काळ निर्णय घ्यावा. शासनाने याबाबतत उच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करावी आणि ही मोहीम तात्काळ थांबवावी अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
मोर्चाच्यावतीने ग्रामसेवक राजपूत व तलाठी नितीन कांबळे यांनी निवेदन दिले. यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.