Kale - Gaganbawda road closed
कळे - गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. Pudahri File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : कळे - गगनबावडा मार्ग वाहतुकीस बंद

पुढारी वृत्तसेवा

साळवण : दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार अतिवृष्टीमुळे कुंभी व रूपनी नदीपात्रात पाणी वाढल्याने खोकुर्ले व मांडुकलीनजीक रस्त्यावर पाणी आले असून गगनबावडा पोलिसांनी कळे - गगनबावडा मार्ग रविवारी (दि.२१) वाहतुकीस बंद करण्यात आला.

सततच्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील सांगशी, असळज, शेणवडे, मांडुकली व वेतवडे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी पाणलोट क्षेत्रात आज (रविवारी) झालेल्या ८ तासात १०३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण २६७८ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT