Irrigation Wells Scheme AI photo
कोल्हापूर

Kolhapur News | दुष्काळाच्या छायेत सिंचन विहिरींची योजना ठप्प: शिरोळ तालुक्यात केवळ चार प्रस्ताव

निधीअभावी शेतकऱ्यांची विहिरींसाठी प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

Irrigation Wells Scheme

शिरढोण : अल्प पावसामुळे शिरोळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, शेतकऱ्यांना सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणारी सिंचन विहिरींची योजना निधीअभावी ठप्प झाली आहे. तालुक्यात अर्जुनवाड येथून दोन, नांदणी येथून एक आणि लाटवाडी येथून एक, असे एकूण चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र निधी उपलब्ध नसल्याने या प्रस्तावांवरील पुढील कार्यवाही रखडली आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत सिंचन विहिरी उपलब्ध झाल्यास शेतीला मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून विहिरी मंजूर होऊन कामे सुरू होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र निधीअभावी योजना रखडल्याने दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना तातडीने निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीची रूपरेषा बदलण्यात आली असून, प्रस्ताव सादर करण्यापासून निधी वितरणापर्यंतच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

जुलैपासून योजनेची रूपरेषा बदलली आहे. शिरोळ तालुक्यात अर्जुनवाड येथून दोन, नांदणी एक आणि लाटवाडी येथून एक, असे चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र सध्या निधीअभावी योजना पुढे नेता येत नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राप्त प्रस्तावांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- हेमंत परीट, अधिकारी, रोजगार हमी विभाग (शिरोळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT