Drought Relief | ८२ हजारांवर शेतकर्‍यांचे पाच हजार जमा 
कोल्हापूर

Drought Relief | ८२ हजारांवर शेतकर्‍यांचे पाच हजार जमा

जिल्ह्यात एकूण १ लाख ४२ हजार ३१९ शेतकऱ्यांना मिळणार मदत

पुढारी वृत्तसेवा

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली. बुधवारी दिवसभरात ८२ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा झाली असून एकूण १ लाख ४२ हजार ३१९ जणांना याचा लाभ मिळणार आहे.

खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे प्रमाण आणि पिकांच्या परिस्थितीचा आढावा कृषी प्रशासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) आणि ट्रिगर-२ (द्वितीय कळ) लागू करण्यात आले. त्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेती पिके आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्राची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामध्‍ये १ लाख ४१ हजार ८९८ शेतकऱ्यांचे जिरायत पिकांचे, तर ६३७ बागायत शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३१९ जण मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

५९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एकूण ५९ हजार २३६.७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद कृषी प्रशासनाच्या दुष्‍काळी अहवालात आहे. यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांखालील क्षेत्राचा समावेश आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आगामी शेतीच्या हंगामासाठी भांडवल उभारण्याचे आव्हान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

जिल्ह्यातील बारा तालुक्यांत एकूण ७ लाख ३३ हजार ९४६ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी शासनाने दुष्‍कग्रस्त जाहीर केलेल्या आठ तालुक्यांतीलच पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांची अग्रीम मदत थेट खात्यावर जमा होणार आहे. मदत जमा करण्‍याची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT