कोल्हापूर

कोल्हापूर : अवचितवाडी, ठाणेवाडी ग्रामपंचायतीवर प्रवीणसिंह पाटील गटाचे सरपंच

backup backup

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील अवचितवाडी आणि ठाणेवाडी या दोन ग्रामपंचायतीवर बिद्री साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रवीण सिंह पाटील यांच्या गटाचे उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत. अवचितवाडीच्या सरपंचपदी वेदीका संभाजी गायकवाड यांची तर ठाणेवाडीच्या सरपंच पदावर श्वेता भरत घोटणे यांनी बाजी मारली आहे.

ठाणेवाडी येथे प्रवीणसिंह पाटील, संजय मंडलिक, समरजीत सिंह घाटगे यांच्या आघाडी विरुद्ध हसन मूश्रीफ, संजय घाटगे गटात लढत झाली होती. या लढतीत श्री महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीस सात पैकी चार व सरपंच अशा पाच जागी यश मिळाले आहे. तर विरोधी आघाडीस अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागेल. यामध्ये हसन मुश्रीफ गटाला दोन तर संजय घाडगे गटाला एक जागा जिंकता आली. सरपंच पदासाठी श्वेता भरत घोठणे विरुद्ध रचना रमेश गिरीबुवा यांच्या थेट सामना झाला. श्वेता घोटणे यांना २५१ तर रचना गिरीबुवा यांना १२५ मते मिळाली. १२६ गोठणे विजयी झाल्या.

निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये विद्याताई हासुरकर, साधना यमगेकर, वंदना गोते, संभाजी माने हे सत्तारूढ आघाडी करून तर रणजीत तोरसे, पूजा तोरसे, शिवाजी कोळके हे विरोधी आघाडी कडून विजयी झाले. उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्याची आतीषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला.

अवचितवाडी येथे सत्तारुढ चिमकाई देवी परिवर्तन आघाडी व विरोधी जनसेवा,व ग्रामविकास आघाडी अशी तिरंगी लढत सरपंच पदासाठी लढत झाली. यामध्ये सत्तारूढ आघाडी कडून वेदिका संभाजी गायकवाड तर विरोधी ग्रामविकास आघाडी कडून छाया पांडुरंग साळोखे, व जनसेवा आघाडी कडून साक्षी संदीप बोटे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. तिरंगी लढतीत वेदीका गायकवाड यांना ४८६ तर छाया साळोखे यांना ३९५ तर बोटे यांना ४५ मते मिळाली. गायकवाड ह्या ९१मतांनी विजयी झाल्या.

सत्तारूढ आघाडी विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

शोभा भारमल, सुभाष सुतार, किशोरी कारंडे,संदीप भारमल, कल्पना कापसे तर विरोधी आघाडीच्या प्रकाश पुराने,रेश्मा धनवडे यांचा समावेश आहे.निवडणुक निकालानंतर गुलालाची उधळण करीत आपला विजयोत्सव साजरा केला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT