कोल्हापूर

Online Fraud : SIR ची माहिती भरण्याचा बनाव; कोल्हापूरातील डॉक्टरांची ऑनलाईन फसवणूक, जागरुक राहिल्याने नुकसानीपासून थोडक्यात बचावले!

डॉ जयंत वाटवे यांनी सांगितली आपबिती , APK फाईल डाऊनलोड करुन ८४ हजारांची फसवणूकीचा डाव फसला

पुढारी वृत्तसेवा

SIR Online Fraud सध्या एसआयआर मतदार पुनर्निरीक्षण मोहिमे अंतर्गत मतदार यादीची पडताळणी सुरु असून, या पडताळणीतून दोन ठिकाणी नावे असलेले, बनावट यादीत नाव घुसडलेल्यांची पडताळणी होऊन मतदारयादी जाहीर होणार आहे. पण या पडताळणीच्या माध्यमातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. या SIR Special Intensive Revision पडताळणीच्या नावे कोल्हापूरातील एका डॉक्टरांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. पण डॉक्टरांनी जागरुकता दाखवल्यामुळे ते या फसवणूकीतून वाचले आहेत.

असा झाला फसवणूकीचा प्रयत्‍न

डॉ. जयंत वाटवे हे कोल्हापूरातील असून त्‍यांनी एसआयआरच्या माध्यमातून कशी फसवणूक झाली आहे ते सांगितले आहे. त्‍यांना SIR फॉर्मवर वडिलांचे नाव दुरुस्त करायचे आहे यासाठी फोन आला त्‍यासाठी एक बनावट APK फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले. त्‍यांना याची शंका आली पण समोरच्या व्यक्तिने आपण सरकारी नोकर असल्याची खात्री करुन दिली. त्‍यांनी सांगितल्या प्रमाणे फाईल डाऊनलोड केली पण शंका आल्याने त्‍यांनी आपला मोबाईल बंद केला. पण तत्‍काळ त्‍यांना ८४ हजाराचे ट्रान्झॅक्शनचा मेसेज आला. पाठोपाठ बँकेचा कन्फरमेशनसाठी कॉल आला. त्‍यांनी बँकेला हे सांगितले की ही फसवणुक झाली असून कार्ड व अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगितले. परिणामी बँकेने लगेच कारवाई केली व संबधित डॉक्टरांचे पैसे वाचले.

घटनाक्रम

संबंधित डॉक्टरांनी सांगितले की बीएलओने (BLO) मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा फॉर्म भरून नेला होता. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा निरोप आला. नाव दुरुस्तीसाठी मोबाईलवर सातत्याने संपर्क साधण्याचे मेसेज येत होते. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले गेले; मात्र एसआयआर प्रक्रियेची मुदत संपत आल्याने तक्रारदाराने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला.

समोरील भामट्याने ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे सांगत एक लिंक पाठवली आणि वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर प्रक्रियेचे शुल्क म्हणून अवघे ५ रुपये क्रेडिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले. हा व्यवहार फेल झाल्यानंतर भामट्याने थेट एसआयआरच्या संकेतस्थळावर नाव दुरुस्ती करून देतो, असा बनाव रचला.

APK फाईल डाऊनलोड करताच मोबाईलचा ॲक्सेस

संशयिताने स्वतःचे नाव चंद्रशेखर असल्याचे सांगत, "मी सरकारी कर्मचारी आहे, काळजी करू नका," असा विश्वास दिला. सायबर सुरक्षेबाबत शंका असतानाही तक्रारदाराला एका बनावट APK फाईलची लिंक पाठवून ती मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. फाईल इन्स्टॉल होताच तक्रारदाराच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस भामट्याकडे गेला. संशय बळावल्याने तक्रारदाराने फोन कट केला; मात्र तोपर्यंत त्यांच्या क्रेडिट कार्डवरून सुमारे ८४ हजार रुपये परस्पर वळते झाल्याचा मेसेज आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT