कोल्हापूर जिल्हा बँक Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur District Bank Election : जिल्ह‍ा बँक प्रारूप मतदार यादी हरकतींची सुनावणी पूर्ण

विभागीय उपनिबंधक दोन दिवसांत देणार निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी मध्‍यवर्ती बँकेच्‍या प्रारूप मतदार यादीवर प्राप्‍त झालेल्‍या १२३ हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी पूर्ण झालेल्‍या काही हरकतींवर निकाल देण्‍यात आला आहे. तर निकाल प्रलंबित असलेल्‍या हरकतींचा निकाल विभागीय उपनिबंधक महेश कदम पुढील दोन दिवसांत देणार आहेत. सुनावणी पूर्ण करून निकाल देण्‍यासाठी २९ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत आहे. तीन नोव्‍हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्‍हा बँकेच्‍या संचालक मंडळाची मुदत पाच जानेवारी २०२७ ला संपत आहे. त्‍यामुळे सध्‍या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीसाठी १०,१२३ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीवर हरकती मागविण्‍यात आल्‍या. १४ ऑक्‍टोबरपर्यंत यादीवर १२३ हरकती प्राप्‍त विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्‍त झाल्‍या. प्राप्‍त हरकतींवर सुनावणी घेण्‍यात आली.

दाखल हरकतींची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांत हरकतींवरील सुनावणीचा निकाल दिला जाणार आहे. त्‍यानंतर तीन नोव्‍हेंबरला प्रसिद्ध होणार्‍या अंतिम मतदार यादीकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT