कोल्हापूर जिल्हा बँक Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur District Bank Election | कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीपाठोपाठ आता कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत सभासद संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया होईल. संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचा वेग लक्षात घेता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जिल्हा बँकेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, गावोगावी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबतची माहिती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था महेश कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अधीक्षक मिलिंद ओतारी उपस्थित होते.

...अशी असेल निवडणूक प्रक्रिया

ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती व सुनावणी घेऊन निर्णय झाल्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर १० ते २६ दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर छाननी, माघार व अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

नोव्‍हेंबर-डिसेंबरमध्‍ये मतदान

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ते १५ दिवसांत मतदान घेण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे टप्पे

११ ऑगस्ट : ठराव दाखल करण्यास सुरुवात

९ सप्टेंबर : ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत

सुमारे १२ हजार : संभाव्य मतदार संस्था

५ जानेवारी २०२७ : विद्यमान संचालक मंडळाची मुदत समाप्त

नोव्हेंबर-डिसेंबर : संभाव्य प्रत्यक्ष मतदान

चारच व्यक्तिगत मतदार : व्यक्तिगत सभासदवर्गात सध्या केवळ चार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT