कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे यांना अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त के. मंजुलक्ष्मी. शेजारी प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, इंद्रजित बोंद्रे, पूर्वा राणे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व इतर.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur budget | कोल्हापूरकरांना विकासाची स्वप्ने दाखविणारा अर्थसंकल्प

रस्त्यांसाठी 25 कोटी, ऍस्परेशनल टॉयलेट बांधण्यासाठी 2.50 कोटी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तब्बल पाच वर्षांनंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. महसुली व भांडवली असा एकूण 1,497 कोटींचा अर्थसंकल्प असून त्यात कोल्हापूरकरांना विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली आहेत. उत्पन्न वाढविण्याबरोबरच अनेक नवीन योजना, प्रकल्पांचे आश्वासने देण्यात आली आहेत.

महसुली उत्पन्न वाढविणे

घरफाळा विभाग : घरफाळ्यातून 110.17 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. कर आकारणी नसलेल्या मिळकती शोधून त्यांना कर लागू व थकीत घरफाळा वसूल केला जाणार आहे. नगररचनामधून 103 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

अनधिकृत नळ शोधणार

पाणीपुरवठा : पाणीपट्टी शुल्क व सांडपाणी अधिभारातून 88 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. अनधिकृत पाणी कनेक्शन शोधून स्पॉट बिलिंग सिस्टीम कार्यक्षम राबविणे. यूपीआय पेमेंटस्, ई-पॉस मशिनचा वापर वाढविणे, गळती शोधणे, फिल्टर हाऊस येथे सौर ऊर्जेचा वापर करणे.

शिरोली जकात नाका येथे व्यापारी संकुल

इस्टेट विभाग : इस्टेट विभाग मार्केट गाळे, होर्डिंग, पार्किंग व अन्य मनपा मालमत्ता यातून 42.39 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. मनपा मालकीच्या दुकान गाळ्यांचे भाडे रेडिरेकनर पद्धतीने वसूल करणे, शिरोली जकात नाका इमारत व अन्य जागा विकसित करून प्रीमियम व उत्पन्न वाढीचे नियोजन आहे.

कर्ज उभारणी करणार

म्युनिसिपल बाँड, कर्ज उभारणी : अमृत टप्पा 2 मलनिस्सारण योजनेत 30 टक्के मनपा हिस्सा, 85 कोटी निधी उभा करणे. 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पात 30 टक्के मनपा हिस्सा 30 कोटी आहे. त्यासाठी म्युनिसिपल बाँडस अथवा शासन सॉफ्ट लोनद्वारे निधी उपलब्ध करावा लागणार आहे. ऍस्परेशनल टॉयलेट बांधण्यासाठी 2.50 कोटी तरतूद केली आहे.

103 कोटींची अत्याधुनिक मनपाची नूतन इमारत

महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी शेंडा पार्क येथे जागा राखीव आहे. एकूण क्षेत्र 20,234.30 चौ.मी. असून त्यावर 17,314.46 चौ.मी. बांधकाम प्रस्तावित आहे. भविष्यातील हद्दवाढ व लोकसंख्या वाढ विचारात घेऊन 150 नगरसेवकांसाठी सभागृह, पदाधिकार्‍यांची कार्यालये प्रस्तावित आहेत. इमारतीसाठी 103.15 कोटी आवश्यक आहे. प्राथमिक कामांसाठी मनपाने 2 कोटी तरतूद केली आहे.

100 ई-बसेस येणार.. केएमटी सुसाट धावणार...

महापालिकेला 100 ई-बसेस मंजूर आहेत. इलेक्ट्रल वर्कसाठी 17.95 कोटी व डेपो डेव्हलपमेंटसाठी 17 कोटी निधी मंजूर आहे. 100 ई-बसेसचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT