डेंग्यूचा धोका वाढतोय 
कोल्हापूर

Kolhapur : डेंग्यूचा धोका वाढतोय

कोल्हापुरात 36 घरांत डेंग्यूच्या अळ्या; तापाचे 13 रुग्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून मंगळवारी शहरातील 3,711 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 36 घरांत डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्या असून, तापाचे 13 रुग्ण निदर्शनास आले आहेत. तसेच 36 घरांत डेंग्यू अळ्या आढळल्या आहेत.

शहरात सध्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कावीळ व डेंग्यू यांसारख्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मंगळवारी 15 हजार 343 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. डासांची पैदास रोखण्यासाठी 4,361 घरांतील कंटेनरची तपासणी करण्यात आली. यापैकी 28 कंटेनर रिकामे करण्यात आले असून 8 कंटेनरमध्ये डास अळ्या नष्ट करणारे औषध टाकण्यात आले.

महाकाली मंदिर, संध्यामठ गल्ली, राजघाट रोड, आयरेकर गल्ली, रंकाळा रोड, करवीर तीर्थ अपार्टमेंट, गांधी मैदान परिसर, देशपांडे गल्ली, साकोली कॉर्नर, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहूपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, सम—ाटनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, दुधाळी, गंगावेस, पंचगंगा तालीम, उत्तरेश्वर पेठ, उलपे मळा, गोळीबार मैदान, पिंजार गल्ली, शिवाजीनगर, संकपाळनगर, आंबेडकरनगर, कागलवाडी परिसर, दत्त मंदिर परिसर, रेणुका मंदिर, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, टाकाळा, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, मोतीनगर, वर्षानगर, रामानंदनगर, जरगनगर, साळुंखेनगर, खाणबाग, एसएससी बोर्ड, गंगाई लॉन, अंबाई टँक, हरी ओमनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, बोंद्रेनगर, घरकूल योजना, कारंडे माळ, मशीद मोहल्ला, पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, माळ गल्ली, विठ्ठल मंदिर, इंद्रजित कॉलनी, महालक्ष्मीनगर, गोविंद पार्क, नाळे कॉलनी, रचनाकर हौसिंग सोसायटी, सुर्वेनगर, बापुरामनगर, प्रथमेशनगर, देवकर पाणंद, जनाई दत्तनगर, पाचगाव रोड, अनंत प्राईड, जेल परिसर, सुर्वे कॉलनी, साळोखेनगर, शिवगंगा कॉलनी, पाचगाव आदी भागांत सर्व्हेक्षण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT