शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतचा मृतदेह सापडला Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | दानोळी येथील खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून

शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये गाडी आणि चप्पल आढळून आले

पुढारी वृत्तसेवा

Jaysingpur Danoli businessman kidnapping for extortion

दानोळी : येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय 40) याचे सोमवारी (दि.१३) रात्री नऊ वाजता अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणानंतर भरत च्या मोबाईल वरूनच चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर आज (दि.१४) बारा वाजता त्या तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री नऊ वाजता तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय 40) यांचे अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणानंतर भरत च्या मोबाईल वरूनच चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली.

आलेले फोनचे रेकॉर्डिंग ऐकवली पण फक्त मिसिंग घेऊन उद्या बघू, असे सांगितले. यावर ग्रामस्थांनी स्वतः पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना सोबत घेऊन शोधाशोध केली. तेव्हा शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतची गाडी आणि चप्पल आढळून आले. त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा एक मफलर आणि नाईट बूट आढळून आले. तेथे झटापट झाल्याचेही जाणवत होते.

दुपारी बारा वाजता त्याच ठिकाणापासून शंभर फुटावर भरतचा मृतदेह सापडला. ओठावर व तोंडावर मारहाण झाल्याच्या खुणा होत्या. याप्रकरणी दोन संशितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, डीवायएसपी ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT