शौमिका महाडिक Pudhari FIle Photo
कोल्हापूर

Shoumika Mahadik| शौमिका महाडिक यांची सहानुभूती म्‍हणजे पुतना मावशीचे प्रेम

दूध संस्‍था प्रतिनिधींचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्‍या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदत्व रद्द करण्‍याच्‍या प्रक्रियेतील ४१० दूध संस्‍थांप्रति दाखविलेली सहानुभूती म्‍हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्‍याचा आरोप संबंधित दूध संस्‍थांच्‍या प्रतिनिधींनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. तसेच, दूध संस्‍थांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्‍यासाठीच त्‍यांच्‍याकडून या ४१० दूध संस्‍थांना ‘ब’ वर्ग सभासद करण्‍याचा घाट सुरू असल्‍याची टीकाही संस्‍था प्रतिनिधींनी केली.

प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे, शौमिका महाडिक यांनी दूध संस्थांना ‘ब’ वर्ग सभासद करण्याची भूमिका मांडली असून, अशा प्रकारची तरतूद कायद्यातच नाही आहे. दूध संस्थेची नोंदणी होण्यासाठी आवश्यक दूध संकलनाची अट पूर्ण केल्यानंतरच सहायक निबंधकांकडून नोंदणी दिली जाते. त्यानंतरच ‘गोकुळ’चे सभासदत्व मिळते. त्यामुळे संस्थांच्या वैधतेवर प्रश्‍न उपस्थित करणे हे वस्तुस्थितीला धरून नाही. गेल्या तीन वर्षांत संबंधित ४१० संस्थांनी ‘गोकुळ’ला सुमारे साडेचार कोटी लिटर दूधपुरवठा केला आहे. संस्थांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्‍न सुरू असून, याची नोंद दूध संस्‍था सभासद, दूध उत्‍पादक यांनी घेतली आहे. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्‍न करणार्‍यांना सभासद योग्य वेळी उत्तर देतील, असा इशारा पत्रकातून दिला आहे. संस्‍था प्रतिनिधींनी पत्रकामध्‍ये पुत्र प्रेमापोटी प्रभू श्रीरामचंद्रांनाही १४ वर्ष वनवासात पाटवून कैकयीनेसुद्धा शोक व्‍यक्‍त केला होता, असे सूचक विधान केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT