Kolhapur Crime News  
कोल्हापूर

Kolhapur Crime : अर्वाच्य शिवीगाळ करत महिलांवर रंगफेक; तरुणाला जमावाचा चोप

शिरढोण-टाकवडे मार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शिरढोण-टाकवडे मार्गावर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांवर रंग फेकत अर्वाच्य शिवीगाळ करत हुल्लडबाजी करणाऱ्या इचलकरंजीतील तरुणाला संतप्त जमावाने पकडून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास टाकवडे येथील शाहू चौकात घडली. मात्र जमावाच्या तावडीतून सुटून संबंधित तरुणाने पलायन केले.

शिरढोणहून इचलकरंजीच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेले तिघे तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांवर रंग फेकत, शिवीगाळ करत हुल्लडबाजी करत होते. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि दुचाकीस्वार संतप्त झाले. काहींनी या तिघांना टाकवडे येथे अडवले. परिस्थितीची चाहूल लागताच दोघेजण तेथून पळून गेले. मात्र एक तरुण नागरिकांच्या हाती लागला. संतप्त जमावाने त्याला शाहू चौकात बेदम चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र संधी साधून त्याने तेथून पलायन केले. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावात उशिरापर्यंत सुरू असलेल्या तरुणांच्या धिंगाण्यावरही पोलिसांनी आळा घालत मोठ्या आवाजात लावलेले स्पीकर बंद करण्यास भाग पाडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT