Crime News  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime : आसुर्ले येथे महाप्रसादाच्या वादातून तरुणावर दगडी फरशीने हल्ला, पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील 'संयुक्त माळवाडी गणेश मंडळा'चा महाप्रसाद करताना चुलीतील कोळसा बाजूला काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर दगडी फरशीने हल्ला करण्यात आला. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाला असून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी गल्ली (आसुर्ले) येथील अजय प्रसाद माळी (वय २४) हे २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता गणेश मंडळाच्या महाप्रसादाच्या कामात मदत करत होते. बिर्याणीला दम देण्यासाठी चुलीत कोळसा एकत्र करत असताना प्लास्टिक जळाल्याने त्यांनी तो कोळसा बाजूला काढला. "जेवण खराब होईल म्हणून कोळसा बाजूला काढला," असे अजय यांनी सांगितले असता, आरोपी सुरेश आनंदा पाटील याने रागाच्या भरात त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तिथेच पडलेल्या दगडी फरशीने अजय यांच्या डोक्यात दोन ठिकाणी मारून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी अजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसांनी सुरेश आनंदा पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT