अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार 
कोल्हापूर

Kolhapur Crime : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार

जुना बुधवार पेठेतील नराधमाला बेड्या; कॅफे, लॉजवर अत्याचार : ठार मारण्याचीही धमकी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अश्लील चित्रफीत, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 24 वर्षीय विवाहितेवर महाद्वार रोडवरील कॅफे, कळंबा व कात्यायनी येथील लॉजवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीला आली. जुना राजवाडा पोलिसांनी नराधम फय्याज फिरोज शेख (23, जुना बुधवार पेठ) याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

संशयित फय्याज शेख याने ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर भेदरलेल्या पीडितेने जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तत्काळ संशयिताच्या अटकेची कारवाई केली. जुलै 2022 ते 27 एप्रिल 2026 या काळात हा प्रकार घडला असल्याचे पो.नि. किरण लोंढे यांनी सांगितले.

पीडितेला दोन अपत्ये आहेत. महाद्वार रोडवरील एका ज्वेलरी दुकानात दोघेही कामाला होते. त्यातून ओळख झाली. त्यांचे सुत जुळले. मुलासह नवऱ्याला सोडून दिल्यास लग्न करण्यास तयार असल्याची त्याने बतावणी केली. दरम्यानच्या काळात कोल्हापूर, महाद्वार रोडवरील हँग ओव्हर कॅफे, कात्यायनी येथील व्हाईट हाऊस आणि कळंबा येथील सारथी लॉजवर नेऊन नराधमाने बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

संशयिताने चित्रफीत व अश्लील फोटो तयार करून त्या आधारे वारंवार ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. नराधमाच्या भूलभूलय्याला बळी पडून पीडितेने पतीपासून घटस्फोटही घेतला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केल्याचेही तिने नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT