कोल्हापूर

Kolhapur Burglary News| वडणगेत चोरट्यांचा धुमाकूळ! दोन बंद घरे फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास; CCTVत कैद झाली चोरी

या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. Kolhapur News CCTV Footage Theft Kolhapur Housebreaking in Vadange

पुढारी वृत्तसेवा

वडणगे : कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या वडणगे गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गावातील दत्तात्रय कॉलनी आणि सासने मळा परिसरात दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

चोरट्यांनी गावातील दोन वेगवेगळ्या भागांत घरफोडी केली. येथील रहिवासी दीपक कोपल यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी आतील किंमती मुद्देमाल लंपास केला. या परिसरातील सतीश यादव यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून दागिने आणि रोकड चोरून नेली. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोरटे घरात शिरताना आणि चोरी करून पळून जाताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, करवीर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली असून, आरोपींना पकडण्यासाठी 'युद्ध पातळीवर' मोहीम राबवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT