Crime News pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : ड्राय-डे दिवशी शिरोली परिसरात दारूविक्री, दोघांवर कारवाई ८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

पुढारी वृत्तसेवा

नागाव : गणेश चतुर्थी या ड्राय डे दिवशी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांवर शिरोली पोलिस पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली ता. हातकणंगले गावच्या हद्दीतील हॉटेल जिद्दच्या मागील बाजूस आडोशाला उघड्यावर आरोपी सतीश नामदेव चौगुले ( वय ४०, रा. अण्णाभाऊ साठे चौक, पुलाची शिरोली) हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री करत असल्याचे आढळला.

त्याच्याकडून २,३२० रुपये किमतीचा टॅगो पंच' ब्रँडच्या १८० मिलीच्या देशी दारूच्या २९ बाटल्या जप्त केल्या तर सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास शिरोली फाट्यावरील हॉटेल किनारा शेजारील पाश स्टील गोडाऊनच्या पाठीमागील बाजूस आडोशाला उघड्यावर आरोपी राजेश अरुण भोईटे (वय ३३, रा. तीन बत्ती चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या विविध ब्रँडची दारू विक्री करताना आढळून आला त्याच्याकडून १८० मिलीच्या हर्ष ब्रॅन्डी कंपनीच्या १७ बाटल्या किंमत २,५५०/- रुपये , व १८० मिलीच्या ब्लॅक सिलेक्ट व्हिस्की कंपनीच्या १० बाटल्या किंमत २,०५०/- रुपये तर १८० मिलीच्या मास्टर डिलाईट प्रीमियम व्हिस्की कंपनीच्या ८ बाटल्या (किंमत १,२००/- रुपये) असा एकूण ५८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला . या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली असून अधिक तपास शिरोली पोलिस करीत आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT