शिरोली पुलाची: हातकणंगले पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शाहीद समीर सनदे (वय २२, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला.
हातकणंगले पोलिस ठाण्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी शाहीद समीर सनदे याला २६ एप्रिल २०२६ रोजी अटक केली होती. आरोपीने जामिनासाठी कोल्हापूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारी पक्षातर्फे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी करण्यात आली. तपासी अधिकारी अमोल ठाकूर, जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर तपासातील अहवाल व उपलब्ध पुरावे सादर केले.
न्यायालयाने न्यायवैद्यकीय अहवालातील निष्कर्ष तसेच गुन्ह्यातील उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपी शाहीद समीर सनदे याचा जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणाच्या तपासात जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, तपासी अधिकारी अमोल ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले.