kolhapur Crime news | महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; तिघेजण ताब्यात File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime news | महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; तिघेजण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कुमार सुभाष कांबळे (वय 27, रा. हरगापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याने हा व्हिडीओ काढला असून, त्याच्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करणार्‍या विठ्ठल गोपाळ सुतार (28, रा. मुत्नाळ), आकाश रामू कलाज (23, रा. सोलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार 14 मे 2026 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कुमार कांबळे याच्या फोनवरून सदर महिलेला फोन करून तिला, तिचा मुलगा व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिला अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगून तिचा नग्नावस्थेतील व्हिडीओ करून घेतला. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने व्हायरल केला. याप्रकरणी पीडितेने 23 मे रोजी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT