चैनी, दारू पार्ट्यासाठी शेजारच्या घरातील दागिने, रोकडवर डल्ला 
कोल्हापूर

Kolhapur News : चैनी, दारू पार्ट्यासाठी शेजारच्या घरातील दागिने, रोकडवर डल्ला

सरनोबतवाडीतील तरुण जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : चैनी आणि मित्रांसमवेत दारू पार्ट्यासाठी शेजारचे घर फोडून चाळीस हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. यश संतोष जाधव (वय २०, रा. सरनोबतवाडी ग्रामपंचायत शेजारी) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून २ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चारचाकी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करणाऱ्या यश जाधवला शेजारी राहणारे गुरूप्रसाद केरबा माने (रा. सरनोबतवाडी) यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होती. दि. २६ जून ते दि. ३ जुलै२०२६ काळात माने परगावी गेले होते. त्याची वृद्ध आई घरी होत्या. वृद्धेची नजर चुकवून संशयिताने घरात प्रवेश केला. कपाटातील तीन पदरी सोन्याची माळ व ४० हजारांची रोकड लंपास केली.

चोरीचा प्रकार लक्षात येताच गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार वैभव पाटील, प्रदीप पाटीलसह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले.

चैनी आणि मित्रांसमवेत पार्ट्या करण्यासाठी शेजारच्या घरात रोकड, दागिन्यांवर डल्ला मारल्याची त्याने कबुली दिली. ३० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. संशयिताला गांधीनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT