illegal abortion case  
कोल्हापूर

Kolhapur Illegal abortion : भोगावतीत बेकायदा गर्भलिंग निदान सेंटरवर छापा; ५ ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई : सोनोग्राफी मशिन, औषधसाठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भोगावती, शाहूनगर परिते (ता. करवीर) परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात सेंटरचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी सायंकाळी छापा टाकून पर्दाफाश केला. पथकाने सूत्रधारासह ५ जणांना ताब्यात घेतले असून सोनोग्राफी मशिनसह औषध साठाही हस्तगत केला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

भोगावती परिसरात पोलिस दप्तरी गंभीर कारनाम्याचे रेकॉर्ड असलेल्या टोळीकडून बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात सेंटर चालविले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. सामाजिक संस्थांसह आरोग्याधिकारी उत्तम मदने यांनी याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक शेष मोरे यांच्यासह पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने छापा टाकून कारवाई केली.

कारवाईने खळबळ

रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. बुधवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल कारवाईची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईने करवीर तालुक्यात खळबळ माजली आहे. चौकशीच्या दृष्टीने संशयिताच्या नावाबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT