खोतवाडी : येथे सुगंधी तंबाखू कारखान्यावर छापा टाकून जप्त केलेला मुद्देमाल व ताब्यात घेतलेले संशयीत.  
कोल्हापूर

Kolhapur News : खोतवाडीत सुगंधी तंबाखू कारखान्यावर छापा

20 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

यड्राव : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे सुगंधी तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत कच्चा माल, रासायनिक पदार्थ, पॅकिंग साहित्य व उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा सुमारे २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहापूर पोलिस व अन्न औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केली. याबाबतची फिर्याद अन्न व औषध प्रशासन निरीक्षक विजय पाचपुते यांनी दिली आहे. याप्रकरणी कारखान्याचा मालक विनायक आनंदा मुठाणे (वय ३७, रा. आर.के.नगर, शहापूर) तसेच कर्मचारी अविनाश राजेंद्र कोळेकर (३८, रा. इचलकरंजी), पुनाराम सोमलाल नाईक (३६), गोपालराम अर्जुनराम नाईक (२१), मुळाराम बीयाराम नाईक (२१, तिघे रा. सध्या आरके नगर, शहापूर, मूळ रा. डेगाना, राजस्थान) यांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT