तलवारीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक 
कोल्हापूर

Kolhapur Crime : तलवारीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

विक्रमनगर, जोशी गल्लीत छापा; २ तलवारी हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धारदार तलवारीच्या धाकावर विक्रमनगर, जोशी गल्ली परिसरात दहशत माजविणाऱ्या कृष्णा प्रकाश मच्छले (वय ३९, रा. जोशी गल्ली, कोल्हापूर) यास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी छापा टाकून अटक केली. संशयिताकडून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

रिक्षाचालक साद पठाण याच्या खुनानंतर राजारामपुरी पोलिसांनी विक्रमनगर, टेंबलाईवाडीसह परिसरातील सराईत गुन्हेगारांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. संशयित कृष्णा मच्छले हा धारदार तलवारी बाळगून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक सचिन चंदन, अमोल पाटील, शाहू तळेकर यांनी सोमवारी सकाळी छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीअंती पथकाने जोशी गल्ली येथील पत्र्याच्या शेडची झडती घेऊन दोन तलवारी हस्तगत केल्या. संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जोशी गल्लीतील शेडमधून दोन हजार रुपये किमतीचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT