Kolhapur Rajarampur Murder
कोल्हापुरातील राजरामपुरी येथे पंकज भोसले या युवकाचा खून झाला  (Photo By Naj Trainer)
कोल्हापूर

Kolhapur Crime News : राजारामपुरी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

रणजित गायकवाड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कनान नगर येथील पंकज निवास भोसले (वय 32) या युवकाचा चार हल्लेखोरांनी काठी आणि दगडाने ठेचून खून निर्घृण खून केला. राजारामपुरी 13 गल्ली येथील दीपा गॅस एजन्सी नजीक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. मंगळवारी (2 जुलै) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. कनान नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

SCROLL FOR NEXT