Kolhapur Crime News 
कोल्हापूर

Kolhapur Crime : कौटुंबिक वादाने गाठले टोक, पतीकडून पत्नीचा विळ्याने खून

नूल येथील निर्घृण हत्‍येने खळबळ : संशयितास अटक

पुढारी वृत्तसेवा

नूल : कौटुंबिक वादाला कंटाळून पतीने पत्नीचा विळ्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. नूल (ता. गडहिंग्लज) येथे रविवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. हत्‍येनंतर शेतात लपून बसलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली. भीमाप्पा चंद्राप्पा चितारी (४३) असे त्‍याचे तर चित्रांजली भीमाप्पा चितारी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे.

भीमाप्पा चितारी याचा वेल्डिंग व्यवसाय व शेती तर चित्रांजली घर सांभाळत होती. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. भीमाप्पा हा आईपासून विभक्त राहात होता. पत्नीने भीमाप्पाच्या मागे शेती माझ्या नावावर कर, असा तगादा लावला होता. या विषयावरून दोघांत भांडण व्हायचे तसेच अन्य काही कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद व्हायचा. रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्‍हा वाद झाला. नेहमीचेच भांडण असल्यामुळे शेजार्‍यांनी दुर्लक्ष केले. मात्र राग अनावर झाल्यामुळे भीमाप्पाने अंगणातच विळ्याने चित्रांजलीच्या मान, खांदा व हातावर पाच ते सात सपासप वार केले. वर्मी घाव बसल्यामुळे चित्रांजली यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT