Rabies file photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : कुत्रा अंगावर सोडल्याने महिला जखमी; श्वानमालक पती-पत्नीला बेदम मारहाण

पाचजणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : येथील न्यू वसाहतमध्ये रस्त्यावर दुचाकी उभी करून शेजारी असणार्‍या एकावर कुत्रा सोडला म्हणून श्वानमालक पती-पत्नीला बेदम मारहाण केली. शुक्रवारी (दि. १९) रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पाचजणांवर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शबाना खालीत पटेल (वय ३२, रा. नवीन वसाहत, चंदगड) यांनी फिर्याद दिली आहे. कुत्रा अंगावर धावून गेला म्हणून सलीम दस्तगीर सय्यद, ईकलाद सलीम सय्यद, अफरीत सलीम सय्यद, रिहाना सलीम सय्यद, साजन ईकलाद सय्यद या पाचजणांनी फिर्यादी शबाना व त्यांचे पती खालीत पटेल या दोघांना मारहाण केली. तर, सलीम सय्यद यांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार आपली सून साजन ही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली असून जीवे मारण्याच्या धमकीबद्दल पटेल दाम्प‍त्यासह जहाँगीर मोहम्मद पटेल, रिहान जहाँगीर पटेल व खातूनबी मोहम्मद पटेल या पाचजणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT