चंदगड : दातांवरील उपचारांसाठी दवाखान्यात आलेल्या तरुणीचा डॉक्टरनेच विनयभंग केला. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. संतोष जाधव (सध्या रा. गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कॉलेज रोडवर ‘श्री’ या नावाने दातांचा दवाखाना आहे. त्याच्याकडे पीडित तरुणी दात दुखत असल्याने उपचारांसाठी गेली होती. दात स्वच्छ करावयाचे आहेत, असा बहाणा करून डॉक्टरने पुन्हा येण्यास सांगितल्याने ती डॉक्टरकडे गेली. यावेळी डॉक्टरने अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला.