लाच प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षक अडचणीत (Pudhari File Photo)
कोल्हापूर

Kolhapur Crime : लाच प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षक अडचणीत

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) लाच प्रकरणात अडचणीत सापडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या वादातील प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी संबंधित महिला अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री एसीबीने सापळा रचला. मात्र, सापळा पूर्ण होऊ शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याची वेळ ठरवण्यात आली होती. त्यासाठी एसीबीचे पथक पोलिस ठाण्यात दबा धरून होते. मात्र, सापळ्याची चाहूल लागताच संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तिला रंगेहाथ पकडण्यात एसीबीला यश आले नाही. तरीही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्याकडे चौकशी केली असून, संपूर्ण प्रकाराची नोंद घेतली आहे.

रात्री उशीर झाल्याने तत्काळ अटकेची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी (दि. २३) संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याविरोधात अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास पोलिस ठाण्यात सर्व अंमलदारांची हजेरी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने काही क्षणातच ही माहिती पोलिस दलात आणि शहरात पसरली. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT