Murder Case Pudhari
कोल्हापूर

Kolhapur crime | नूल येथे कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून

गडहिंग्लज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

नूल : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे रविवारी रात्री ११ वाजता कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा विळ्याने सपासप वार करून निर्घृण खून केला आहे. या घटनेतील आरोपी पतीचे नाव भिमा चंद्राप्पा चितारी (वय ४३) असे असून, मृत पत्नीचे नाव चित्रांजली भिमा चितारी (वय ३८) आहे.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भिमा चितारी याला तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पाटील परशराम सरनाईक यांनी फिर्याद दिली असून, गडहिंग्लज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT