राशिवडे : प्रतितोळा पंचवीस हजार रुपये दराने एक किलो सोने देतो म्हणून बारा लाख एकोणसाठ हजारांची फसवणूक करणाऱ्यां भाऊसो कृष्णात कुंभार रा.केळोशीपैकी कुंभारवाडी ता.राधानगरी याला राधानगरी पोलीसांनी अटक केली.याबाबत वसंत शिवाजी भोसले रा.कळंकवाडी ता.राधानगरी यांनी तक्रार दाखल केली होती.
याबाबत राधानगरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी भाऊसो कुंभार यांने प्रति तोळा पंचवीस हजार रुपये दराने एक किलो सोने देतो म्हणून तक्रारदार वसंत भोसले यांचेकडुन तारळे गावामध्ये अडीच लाख, शिरगाव येथे दीड लाख, तर फोन पे वरुन आठ लाख एकोणसाठ हजार असे मिळून बारा लाख एकोणसाठ हजार रुपये घेतले. परंतू सोने न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोसले यांनी कुंभार यांचे विरुद्ध राधानगरी पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती,त्यानुसार भाऊसो कुंभार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सोने खरेदी अथवा अन्य कोणत्याही कारणाने कोणाची फसवणुक झाली असल्यास राधानगरी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पो.नि.संतोष गोरे यांनी केले आहे.अधिक तपास पो.कॉ. कृष्णात खामकर करत आहेत.